काल सहावीच्या वर्गात मराठी विषयाचा सुगंधी सृष्टी ह्या पाठाचं अध्ययन- अध्यापन चालू होतं. विद्यार्थी आपल्या घरासमोर, शेतात, शेजारच्या घरासमोर असणाऱ्या फुलाचे नाव सांगत होते. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, "सर मी उद्या गुलाबाचे फुल आणीन." "मी जस्वानंदाचे फुल आणीन". - दुसरा उत्तरला. अन् त्यातूनच पुष्प प्रदर्शन भरविण्याची भन्नाट कल्पना सुचली. आज इयत्ता सहावीच्या वैष्णवी गांगुर्डे ,अश्विनी लहाने, प्रीती छत्रे, कोमल गांगुर्डे, रौनक शहा ,रोशनी शहा, यश काळे असद शेख, या आठ विद्यार्थ्यांनी विविध फुले प्रदर्शनात मांडले होते. पुष्प प्रदर्शन बघण्याची शाळेतील १५० हुन अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळाली. शाळेचे मुख्याध्यापक मा.उमाकांत धतींगे सरांनी उद्घाटन केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.🌹🌷💐🌼🌸🌺🪷🥀
No comments:
Post a Comment